भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी

data to ek jana | narayana smaravi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥ आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥ यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥ तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥