हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें
hatin dharun javen | tenen paraten chi vhaven
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
hatin dharun javen | tenen paraten chi vhaven
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
hatin hon davi bena | kariti lenkichya dharana
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
hatinchen na sandaven deven | sharan alon jiven bhaven | apulen aisen mhanaven | kariton jiven nimbalon
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥ध्रु.॥
harapalyachi naka chittin | dharun khanti vanyan cha
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
haraponi geli nishi | nidra kaisi na dekhon
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥
haras anandacha | ghosh kara harinamacha | kon ha daivacha | bhag pave yethil
हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥
halavuni khunt | adhin karava balakat
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥ मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
hason ruson atan vadhavun avadi | antarinchi godi avit te
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥
hit jane chitta | kalon yetase uchit
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥ परिहार ते संपादणी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥
hit ten hen ek ram kanthin rahe | nathaviti dehabhav dehi
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥ हाचि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥
hit nahi thave janani janaka | davila laukikachar tihi
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥ अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥ध्रु॥
hit vhaven tari dambh duri theva | chitta shuddha seva devachi he
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥ आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
hit sange tenen dilen jivadan | ghataki to jan manamagen
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥ बळें हे वारावे आडरान करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥
hitavari yaven | koni bolilon ya bhaven
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥ नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥
hira thevitan airanin | vanche maritan jo ghanin
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
hira shobhala kondanin | jadit manikanchi khani
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥
hinch tyanchin panchabhuten | jivan bhaten premachen
हींच त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
hin majhi yati | vari stuti keli santin
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥
hin shur buddhipasin | akrutisi bhed nahin
हीन शुर बुद्धीपासीं । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥
hundaki pisavi halavita dadhi | male mani odhi nindechite
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचीते ॥१॥ त्याचें फळ पाकीं यमाचे ते दंड । घर केलें कुंड कुंभपाकी ॥ध्रु.॥