भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे

hit vhaven tari dambh duri theva | chitta shuddha seva devachi he

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥ आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥ तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥