भजनी मालिका
← भजनांकडे परत

हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील

haras anandacha | ghosh kara harinamacha | kon ha daivacha | bhag pave yethil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥ काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥ जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥