भजनी मालिका
← भजनांकडे परत

हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचीते

hundaki pisavi halavita dadhi | male mani odhi nindechite

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचीते ॥१॥ त्याचें फळ पाकीं यमाचे ते दंड । घर केलें कुंड कुंभपाकी ॥ध्रु.॥ क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥ तुका म्हणे स्नान केलें मळमूत्रें । जेविलीं पितरें अमंगळें ॥३॥