भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा

hatin hon davi bena | kariti lenkichya dharana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥ सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥२॥ टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥ बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥ मुदबख लिहिणें । तेलतुप साबण केणें ॥५॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥ राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥ वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥ अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥ तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥