भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही

hit ten hen ek ram kanthin rahe | nathaviti dehabhav dehi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥ हाचि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥ चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥ अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥