बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं
buddhihinan jadajivan | nako deva upekshun
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
buddhihinan jadajivan | nako deva upekshun
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
buddhicha janita lakshmicha pati | athavitan chittin kay navhe
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥
buddhicha palat dhara re kanhin | maguta ha nahin manushyadeh
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥
buddhimanda shirin | bhar phajiti padarin
बुद्धीमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंके जन ॥ध्रु.॥
begadacha rang rahe kon kal | ang hen pital na dekhatan
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥
baisatan konapen nahin samadhan | vivare hen man te chi soi
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥
baisata chorapashin taisi hoy buddhi | dekhatachi chindhi man dhave
बैसता चोरापाशीं तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे ॥१॥ व्याभिचाऱ्यापासी बैसता क्षणभरी । देखताची नारी मन धावे ॥धृ ॥.
baisalon ton kadiyevari | navhen duri vegala
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥ घडलें हें बहुता दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥
baisalonse darin | dharanen kondoni bhikari
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
baisavuni pheri | gadiyan madhyabhagin hari | avaghiyanchen kari | samadhan sarikhen
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥
baiso atan manin | ale taisen chi vadanin
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥ मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥
baiso khelun jevun | tethen nam tujhen gaun
बैसो खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥ रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥
baison pathamorin | mana vate taise karin
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥ परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥
baisoni nivant shuddha karin chitta | taya sukha antapar nahin
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
baisoni nishchal karin tyachen dhyan | deil to annavastradata
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
baisoniyan khaun jodi | odhaodhi chukavuni
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥
bol nahin tujhya datrutvapanasi | amhi avishvasi sarvabhaven
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥ दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ध्रु.॥
bol bolatan vate sopen | karani karitan tir kampe
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥
bolanen chi nahin | atan devavin kanhin
बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥
bolanen ten amhi bolon upayogin | padilen prasangi kalaaisen
बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥