भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें

bol nahin tujhya datrutvapanasi | amhi avishvasi sarvabhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥ दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ध्रु.॥ चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व । किती करू गर्व आता पुढे ॥२॥ तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥