भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे

buddhicha janita lakshmicha pati | athavitan chittin kay navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥ गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥ अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥ लटिका हा केला संवसारसिंधु ॥ मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निंश्चित त्याच्या बळें ॥५॥