भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे

bol bolatan vate sopen | karani karitan tir kampe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥२॥ तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥