भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं

buddhihinan jadajivan | nako deva upekshun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥ चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचना ॥२॥ तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥