भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल

sangatan atan na vate kharen | bhogitan baren janavel

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥ तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥ यमजाच होतां दंड । न चले खंड धन देता ॥३॥ निळा म्हणे ऐशी गती । होऊनि पुढती गर्भवास ॥४॥