भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज गेलो पंढरपुरा । विश्वंभरा भेटीसी

sahaj gelo pandharapura | vishvambhara bhetisi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सहज गेलो पंढरपुरा । विश्वंभरा भेटीसी ॥१॥ तो हा उभा विटेवरी । देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥ ज्याचिये तेजें धवळलें नभ । हा जगदारंभ अंगकांति ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हादिकां । व्यापक लोकां सकळां जो ॥४॥