भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुध्द सात्विकी ब्राम्हण । सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण्

shudhda satviki bramhan | satvarajamishrit kshatriy jan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शुध्द सात्विकी ब्राम्हण । सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥ रजतमें वैश्य निर्माण । शूद्रा तमो निर्मिता ॥२॥ नाना याति नाना भेद । यांपासुनी शाखा विविध ॥३॥ निळा म्हणे निषिध्द तमीं । अनामिकादि पापकर्मी विटाळ ॥४॥ हे तों याति स्वाभाव गुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥५॥ अवघे ठायीं पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥६॥ निळा म्हणे गुणवांटणी । योगी विभाग चहूं वर्णी ॥७॥