भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा

sakal santancha ha raja | svami ekanath majha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥१॥ ज्यांचे घेताचि दरुषण । पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥ ज्यांचे वचिता भागवत । प्राणी होय जीवनमुक्त ॥३॥ निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥४॥