भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें

marga dauni gele adhin | dayanidhi sant pudhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥ तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥ मोडूनियां नाना मतें । देती सिध्दांते सौरसु ॥३॥ निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥