भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें

mi ton nenen vyasavani | artha gahyartha je je puranin | bolile kavi prasad vani | tehi artha mi nenen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥१॥ आपुलिये आवडीचिये भरीं । गौरविली म्यां हे वैखरी । श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥ परी एक आहे विश्वास थोरु । स्वामी तुकया हा सद्गुरु । न करील कदाही अव्हेरु । भाव माझा जाणोनी ॥३॥ कृष्णचरित्रीं हे वाग्बाणीं । वदविली तिहिंचि वर देउनी । पुरविली माझी हे आयणी । आर्त जाणोनि अंतरीचें ॥४॥ निळा म्हणे कृष्णार्पण । होतु कथिलें ते कृष्णगुण । ऐशी हे प्रार्थना करुन । ठेविला मस्तक चरणांवरी ॥५॥