भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां

mi majhen pahatan na dekhechi dithi | adi madhya shevatin vicharitan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥ टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥ मृगजळनदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥ निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी त्या ॥४॥