भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष

maya brahamincha abhas | nahin te bramhi ni:shesh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥ यालागीं दिसे ते टवाळ । रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥ सूर्यचि सूर्यातें प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥३॥ निळा म्हणे स्वसंवेदया । नातळे विदया ना अविदया ॥४॥