भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥ परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ ॥१॥ हे तों यातिस्वभावगुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां ॥१॥ न फिटेचि तरी त्यांचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त पहावया तांतडी । नामचि ऐकोनि घाली उडी । निजदासाचीं सांकडीं । न देखे नाईके सर्वथा ॥१॥ ऐसा भक्तां ऋणाईत । सर्वदा सेवेसी तिष्ठत । मागें पुढें सांभाळित । त्यांच्या प्रेमासी भुलला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥ इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त स्तवनें जें जें करिती । तें जें ऐकोनियां श्रीपती । सुखें संतोषोनियां चित्तीं । दासा देती वरदानें ॥१॥ ध्रुवानें वनीं आराधिला । तैसाचि उपमन्यें स्तविला ।एक तो अढळपदीं स्थपिला । एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा