भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त म्हणावें तयासी । न गुंते जो आशापाशीं

bhakta mhanaven tayasi | na gunte jo ashapashin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त म्हणावें तयासी । न गुंते जो आशापाशीं ॥१॥ अहंकार निरसिला । देहभाव पालटला ॥२॥ निंदा स्तुति हे नावडे । पाहतां परब्रम्ह आवडे ॥३॥ निळा म्हणे तया ध्यातां । स्वानंद तो येत हातां ॥४॥