भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त करिती तैसा होय । ठेविला ठाय तया स्थळीं

bhakta kariti taisa hoy | thevila thay taya sthalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त करिती तैसा होय । ठेविला ठाय तया स्थळीं ॥१॥ पाचारिती भाविती जेथें । प्रगटे तेथें रुप धरी ॥२॥ जें जे उपचार करिती भक्त । ते ते स्वीकारित बाळापरी ॥३॥ निळा म्हणे भक्तांपाशीं । नाहीं यासी दुराग्रह ॥४॥