भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं । अवघींच इंद्रियें निवालीं । आलिंगनीं तुमचिया ॥१॥ वदनीं आठवलें नाम । तुमचें सांपडलें प्रेम । बरवा साधला हा नेम । मनही विश्राम पावलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥ विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥ सद्गुरुनीं कृपा केली । वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बरें होणार ते झाली माझी गती । हळहळ किती वाढवावी ॥१॥ परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक । दुराविल्या एक मशक मी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बहुता देऊनी अभयदानें । गौरविलें आपल्या मनें । घालूनी शांतीचीं आसनें । ब्रम्हसाम्राज्यीं बैसविलें ॥१॥ ध्यानतन्मयाचीं छत्रें । माथां झळकतीं विचित्रें । अगाध कीर्तीचीं दिव्य वस्त्रें । प्रल्हादादिकां समर्पिलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वही नेलें ॥१॥ करुं जातां याची गाठी । जिवीं जिवा घाली मिंठी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं ॥१॥ जातां मार्गावरोनि पाहे निजदृष्टी । होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा । तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥ तयाचि नांव म्हणिजे वेडें । असोनि पुढें न देखे हित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा