भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ

bramhan sonvalachi sarva kal | vase anamikin vital

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ ॥१॥ हे तों यातिस्वभावगुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥ अवघे ठायीं पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥३॥ निळा म्हणे गुणवांटणीं । योगी विभाग चहूं वर्णी ॥४॥