भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त स्तवनें जें जें करिती । तें जें ऐकोनियां श्रीपती । सुखें संतोषोनियां चित्तीं । दासा देती वरदानें

bhakta stavanen jen jen kariti | ten jen aikoniyan shripati | sukhen santoshoniyan chittin | dasa deti varadanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त स्तवनें जें जें करिती । तें जें ऐकोनियां श्रीपती । सुखें संतोषोनियां चित्तीं । दासा देती वरदानें ॥१॥ ध्रुवानें वनीं आराधिला । तैसाचि उपमन्यें स्तविला ।एक तो अढळपदीं स्थपिला । एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥ प्रल्हादाचें स्तवन गोड । त्याचें पुरवी अवघेंचि कोड । अग्निविषाचें सांकड । नेदी पडों शस्त्राचें ॥३॥ द्रौपदीनें स्तवितांचि तातडीं । नेसतीं झाला तिचीं लुगडीं । कौरवें लाजविलीं बापुडीं । अंगुष्ट तोही दिसों नेदी ॥४॥ गजेंद्राचिया स्तवनासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । निजकरें घालूनियां मिठी । सोडवी संकटी स्वामी माझा ॥५॥ रुक्मिणीचें प्राणिग्रहण । करी ऐकोनियां तिचें स्तवन । पांचाळिये हातींचें भाजीपान । करी भोजन स्तवनें तिच्या ॥६॥ निळा म्हणे कृपामूर्ति । अपार भक्तांचिये स्तुती । ऐकोनियां तोषलेती । मी ही बाळमती विनवितों ॥७॥