भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हानंदे गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली

bramhanande garje vani | harichya gunin matali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्हानंदे गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली ॥१॥ आंवरिताही नावरती । पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥ अवतारचरित्रें जन्मकर्मे । क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥३॥ निळा म्हणे घडघडाट । चालती लोट नावरती ॥४॥