भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा । तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता

aisha pari naman majhen pandharinatha | tunchi houni tujamaji jhalon mi sarata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा । तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता ॥१॥ नये कळों कांहीं आतां एकानेक भाव । तुज माजीं मीहीं मजमाजि तूं सर्व ॥२॥ नाम रुप तूंचि माझे क्रिया कर्तव्य । कायिक वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥३॥ निळा म्हणे मी तूं उपाधी सारुनियां परती । राहों जैसे होतों तैसे निजरुप एकांतीं ॥४॥