भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसिया सुखाची मांदूस । झाली रुपस विठाई

aisiya sukhachi mandus | jhali rupas vithai

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसिया सुखाची मांदूस । झाली रुपस विठाई ॥१॥ मांडूनियां इटे ठाण । धरिला जघन व्दयकरीं ॥२॥ रुपाकृती मानववेष । ईशाईश जननी हे ॥३॥ निळा म्हणे भक्तांसाठीं । फिरे वाळवाटीं । उघडी हे ॥४॥