तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो
tayachiye bhetin javen uthauthin | krupalu jagajethi udar to
तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
tayachiye bhetin javen uthauthin | krupalu jagajethi udar to
तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥
tayache sangati apar | vishranti ghar pandhari
तयाचे संगती अपार । विश्रांती घर पंढरी ॥१॥ म्हणोनि वारकारी भावें । जाती हावें पंढरीसी ॥२॥
tayalagin dnyani mhanati naimittik pitru shraddhadik janaven ten
तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥ संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणें लागे ॥२॥
tarathya tarath marun kela | budatyachen doi dagad dila
तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥ तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥
tarale tarati bharanvasa | kirtanamahima ha aisa
तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा ॥१॥ म्हनोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥
tarale tarati ha nirdhar | namachi sar ghetan vache
तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेतां वाचे ॥१॥ तें हें श्रीरामानाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥
tarale sangati apar | valmikadi ha nirdhar | papi durachar | ajamel tarala
तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥
tari sohan navhe yag | sohan navhe tyag | ani ashtang yog | sohan navhe
तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥
tarich yaven janma | theva pandurangin prema
तरीच यावें जन्मा । ठेवा पांडुरंगीं प्रेमा ॥१॥ नाहीं तरी श्वानसुकर । जन्मा आले ते अपार ॥२॥
taruni rajaki nutan yauvani | baisali rusuni ekantasi
तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥ धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥
talin pruthvin vari gagan | pahatan avaghenchi saman
तळीं पृथ्वीं वरी गगन । पाहतां अवघेंचि समान ॥१॥ रिता ठाव नाहीं कोठें । जगीं परब्रह्मा प्रगटे ॥२॥
talin pruthvivari gagan | pahatan donhinhi saman
तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान ॥१॥ रूप नाम वर्नाश्रम । कर्म अकर्मक बद्धतां ॥२॥
talin harapali dhara | vari thavo nahin ambara
तळीं हारपली धरा । वरी ठावो नाहीं अंबरा ॥१॥ ऐसा सहजीसहज निजे । एकाएकपणेंविन शेजे ॥२॥
tat bhokta ani bhojan | jo avaghachi jhala apan
ताट भोक्ता आणि भोजन । जो अवघाचि झाला आपण ॥१॥ भली केली आरोगण । सिद्ध स्वादुचि झाला आपण ॥२॥
tan man sarvatha | ten bhajan na mane chitta
तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता ॥१॥ वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥
tapatrayen tapaliya pandharisi yaven | darushanen mukta vhaven helamatren
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥
tapaliya tapen shinaliya margin | pohe thaki vegin krushnakatha
तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥
tapaliya tapatrayen santan sharan javen | jivembhaven dharaven charan tyanche
तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥ करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥
tarale name apar jan | aisen mahiman namachen
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥
taravaya jad mudh | ahe ughad upav
तारावया जड मूढ । आहे उघड उपाव ॥१॥ सोपें रामनाम घेतां । नाहीं तत्त्वतां साधन ॥२॥