भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो

tayachiye bhetin javen uthauthin | krupalu jagajethi udar to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥ राक्षसाचे कुळीं बिभिषण जाण । लंकेसी स्थापन चंद्रार्क तो ॥३॥ एका जनार्दनीं उदार सर्वज्ञ । एक नारायण समर्थ तो ॥४॥