भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेतां वाचे

tarale tarati ha nirdhar | namachi sar ghetan vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेतां वाचे ॥१॥ तें हें श्रीरामानाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥ उणें पुरें नको कांहीं । वाया प्रवाहींपडुं नको ॥३॥ एका जनार्दनीं नाम । पूर्ण चैतन्य निष्काम ॥४॥