भजनी मालिका
← भजनांकडे परत

तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता

tan man sarvatha | ten bhajan na mane chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता ॥१॥ वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥ वाचा करुनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ॥३॥ नाम तारक हें जनीं । व्यास बोलिले पुराणीं ॥४॥ एका जनार्दनीं जप । सुलभ आम्हां विठ्ठल नाम देख ॥५॥