भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटी जन्मांचि येरझारी । तें तो हरी रामनाम

koti janmanchi yerajhari | ten to hari ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोटी जन्मांचि येरझारी । तें तो हरी रामनाम ॥१॥ तें तुं वाचे सुगम वदें रामनाम आणीक नको श्रम करुं वायां ॥२॥ श्रम केलिया पडसी सांकडीं । जन्ममरण बेडी तोडी नाम ॥३॥ संतसमागम भावें करी भक्ति । एका जनार्दनीं वस्ती नामीं करी ॥४॥