भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये

kaise charan gomate | dekhile vite pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥ पाहतांचि वेधलें मन । जाहलें समाधान जीवाशीवां ॥२॥ विश्रांतीचें विश्रांतिघर । आगम निगमांचे माहेर ॥३॥ म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वडी करुनी ॥४॥