भजनी मालिका
← भजनांकडे परत

होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील

hoi sharanagat bhaki re karuna | tarich bandhana chukashil

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥ आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥ जंववरी आहे इद्रियसंबंध । तोंवरी तूं बोध करी मना ॥३॥ एका जनार्दनीं मावळलिया दीप । सहजची खेप येईल बापा ॥४॥