सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला
sanvala dekhila nandacha | tenen anandacha pur jhala
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
sanvala dekhila nandacha | tenen anandacha pur jhala
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥
sanvala shrikrushna rakhito gai | vedhiyalen man amuchen ten payin
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥
sanvalen konvalen dhavalen na pivalen | rangaranga vegalen padharinge maye
सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥ चांदिणें जैसें शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥
sanvalen sanulen mhanati tanhulen | khelen ten vahilen vrundavanin
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥
siddhi sadhak jaya hrudayin dhyati | to gopikecha pati viththalarav
सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥
sitechya kaivaren ravan vadhiyela | jauniyan lanke bibhishan sthapila
सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनियां लंके बिभीषण स्थापिला ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागेतीरीं । कट दोनी धरुनी उभा विटेवरी ॥२॥
simagiyache sanin | ramakrushna na mhane konhi
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥ महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥
sukumar harichi paulen | sundar harichin paulen
सुकुमार हरीची पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥ भीमातटीं देखिलें । वोळलें तें पुंडलिका ॥२॥
sukh anupamya santasamagamen | akhand dunavaten namen | dahan hoti sakal karmen | anik varma dujen nahin
सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं ॥१॥ वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥
sukh apar santasangin | dujen angin na dise kothe
सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे ॥१॥ बहु सुख बहुता परी । येथेंची सई नसेची ॥२॥
sukh ek ahe hari athavitan | itar japatan duhkh bahu
सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु ॥१॥ ऐशी आठवण धरूनि मानसीं । हरि गावा मुखासी दिननिशीं ॥२॥
sukh bahu ase amhan | tujha gatan namamahima
सुख बहु असे आम्हां । तुझा गातां नाममहिमा । तेणें अंगी होतसे प्रेमा । नामीं दृढता सदोदित ॥१॥
sukh ramanamen apar | shankar janen to vichar
सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥ गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥
sukhakar murti rup rekhevin | ubha ase vyapun brahmandi ge may
सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय ॥१॥ वेधला जीऊ तयाचिया गुणा । क्षणभरी न बिसंबे दिवकीनंदना ॥२॥
sukhaduhkhanchiya kodi | santadarushanen todi bedi
सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥ थोर मायेचा खटाटोप । संतदरुशनें नुरे ताप ॥२॥
sukharup dhanya janava sansari | sada vache hari uchchari jo
सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥ रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळां संतभेटी ॥२॥
sukharup asatan mhane majhen majhen | sankat dekhoniyan ghali devavari vojhen
सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें ॥१॥ पापी तो अधममती । कदा नेणे नामस्मरण गती ॥२॥
sukhavoni patang dipavari pade | pari shevatin jode deh ant
सुखवोनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटीं जोडे देह अंत ॥१॥ तैसे प्राणिमात्र संसारीं भुलले । कष्ट ते उगले करिताती ॥२॥
sukhachi vishranti sukh samadhan | manachen unman nam gata
सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचें उन्मन नाम गाता ॥१॥ तेंहें नाम सोपें रामकृष्ण हरी । प्रपंच बाहेरी उच्चारितां ॥२॥
sukhen mukh sojval pahatan drushti | anandi anandamay tene srushti
सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥ देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवी श्रीविठ्ठल ॥२॥