भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे

henchi ek kharen | sada vache nam smare

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥ धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥ हरुषे नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥