भजनी मालिका
← भजनांकडे परत

विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं

viparit artha aikatan kanin | purush gabhani stricheni chintanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥ नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरें व्याला सांगुं काय ॥२॥ एक ब्रह्माचारीं कळिलावा मोठा । साठ पोरें व्याला पहा चोहटा ॥३॥ एक मेलें गर्भीं असतां गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥ एका जनार्दनीं उघडली दृष्टी । अर्थ पाहतां सुख होय पोटीं ॥५॥