भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान

amhi brahmapurinche brahman | yatikul nahin lahan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥ आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥ आम्हां सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥ एका जनार्दनीं बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥