भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा

amhi na dekhon avagunan | papi pavitra shahana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥ मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥ तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाटीं ॥३॥