भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं

amhi patit mhanoni tuj alon sharan | kariton chintan divas ratrin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥ आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥ अन्याय कोणाचा अंगीकार करणें । तया हातीं देणें लाज ते चि । काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥ पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी । नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥३॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई । तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥