भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात

amhi din tun dinanath | tihin lokin tujhi mat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥ आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥ आम्ही अनाथ तूं कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥ आम्ही दीन तूं वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥ नको धरुं दुजे आतां । कृपाळु तूं दीनानाथा ॥५॥ एका शरण जनार्दनीं । ऐसें चालत आलें दुरुनी ॥६॥