भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें

amhi nenon bhav kaisa bhaktiras | mhanavun tumache das ekya gunen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥ मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥ नेणों ज्ञान ध्यानमंत्र योगकळा । आसन मुद्रा डोळा लक्ष कैसें ॥३॥ तत्व संख्या नेणो नित्यानित्यज्ञान । आठऊं चरण सकुमार ते ॥४॥ निळा म्हणे अगा रुक्मादेविवरा । आतां उचित करा आपुलें तें ॥५॥