भजनी मालिका

भजने

सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥ बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्मा पुर्ण सांब माझा ॥१॥ सांब उपदेशी उमा मच्छिद्रासी । ब्रह्मारुप त्यासी केलें तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥ म्हणऊनियां आशे लागलों नेणता । बुडवूनि थितां संवसार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां ॥१॥ गोडपणें मिठी पडलीसे जीवां । कायामनें हेवा दुजा नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सार पैं नाम विठठलाचेम आहे । दिननिशीं सोय मना लावी ॥१॥ गुंपजेल मन जोडती पाउलें । तुटती घेतलें मायाजाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सार पैं सांगत उपनिषद तुम्हां । वाचे रामनामा जप करा ॥१॥ हेंचि पैं मथित सांगोनियां गेले । उच्चारितां ठेले ब्रह्मरुप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सारथ्यासीं सांगे हांकीं हा रथवर । पाहियेलें तीर यमुनेचें ॥१॥ उभा राहोनियां पाहे चहूंकडे । बोलताती कोडें पक्षी-राज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव