भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी

sayasacha na kari sos | ek ans santacharani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी ॥१॥ नावडे वैभव विलास मनीं । अनुदिनीं संतसेवा ॥२॥ पेमें प्रेम दुणावलें । सुख जाहलें सुखासी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतचरण वंदी माथां ॥४॥