भजनी मालिका

भजने

सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥ ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सावध सावध राजाई हो सुखें । नामयानें दुःख निरसिलें ॥१॥ संसार सांतें या येऊनि भाग्याचा । छंद विठ्ठलाचा लागला यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सावध सावध राजाई हो सुखें नामयानें दुःख निरसिलें ||१|| संसार सांतें या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी।।२।।

रचनाकार: संत राजाई

सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥ अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तूं जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥ सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥ गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी । मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥

सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।।

रचनाकार: संत जनाबाई

सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥ चांदिणें जैसें शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी॥१॥ डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम