भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां

sayasacha shram na karun pasara | viththalachi bara vache gatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां ॥१॥ गोडपणें मिठी पडलीसे जीवां । कायामनें हेवा दुजा नाहीं ॥२॥ या विठ्ठलापारतें न करीं साधन । देखेन समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलाची भेटी । सरलीसे तुटी गर्भवास ॥४॥