भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं

saha te bhagale vevadati sada | sahanchi apada hoti jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥ सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥ सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥ एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळां ॥४॥