भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्त्रदळ साजिरें नयनाचे शेजारी

sahastradal sajiren nayanache shejari

सहस्त्रदळ साजिरें नयनाचे शेजारी । अर्ध मातृका अंतरी चिन्मय वस्तू ॥१॥ ॐकार नादीं कीं नाद ॐकारीं । दैवीं निरंतर प्रणवीं पहा ॥२॥ मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय । आत्मा एक असे स्वयें रया ॥३॥ ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता । कोण पत्री हे कविता नाहीं ऐसी ॥४॥